ठाण्यात झाड कोसळून एक जखमी तर ११ वाहनांचे नुकसान
ठाणे/ सोनू मोर्ये
पावसामुळे ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्याजवळ प्रशांत कॉर्नर परिसरात आज सकाळी झाड कोसळून ११ वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत ऑफिसला पायी जात असलेले ५२ वर्षीय पवन झा यांच्या डोक्याला व छातीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रगती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


