दवर्ली येथील गौलक्ष्मी सॉ मिलला भीषण आग
मडगाव/
दवर्ली येथील गौलक्ष्मी सॉ मिलला रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत लाकूड साठा, यंत्रसामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिलचे मालक यांनी या आगीत सुमारे ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


