अकोला महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर
अकोला/
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा केला 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव. भाजपच्या शारदा खेडकर यांना 45 मत मिळाली. त्यात भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिला भाजपला पाठिंबा.
दरम्यान, एमआयएमचे 3 नगरसेवक ऐवेळी राहिले तटस्थ. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा ठरला फोल. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने राखली महापालिकेवरील सत्ता. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय.”


