न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सीटीईटी देणा-या शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा… खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती

कोल्हापूर/

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सात आणि आठ फेबुवारीला सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्य सरकारने काल आदेश काढून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि इलेक्शन ड्यूटी (निवडणूक काम) असणाऱ्या शिक्षकांची अडचण झाली आहे. ते लक्षात घेऊन शासनाने ही परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली. दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केले असल्यामुळे या परीक्षेत बसणे शिक्षकांना अतिशय आवश्यक आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याने शासनाने या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीच्या तारखेमध्ये बदल केला आहे. केंद्राच्या सीटीईटी परीक्षेत बसलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे. कोल्हापुरातील परीक्षार्थ्यांना मुंबईचे केंद्र मिळाले आहे. कोल्हापूर अथवा किमान जवळचे केंद्र उपलब्ध करण्याची मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे