अवकाळी पावसाचा जळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांना फटका
जळगाव/
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट व वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ८ तालुक्यांना फटका बसला. चोपडा, रावेर, चाळीसगाव , मुक्ताईनगर ,एरंडोल, पारोळा , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात गारपिटीमुळे ५७ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगावच्या ९ गावांमधील पिकांची हानी झाली आहे. जळगावच्या १७, मुक्ताईनगरच्या ६५, एरंडोलच्या १६, पारोळ्यातील २५ व धरणगावच्या ५४ गावांमधील रब्बी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे.


