न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंदोलक विद्यार्थ्याला ‘पुडी” देऊन केस घालण्याची धमकी दिलेल्या पोलीसाचे अखेर निलंबन..राज ठाकरे यांनी दाखविला व्हिडिओ

मुंबई / वृत्तसंस्था

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसतोय. पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी देतोय. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात राज ठाकरे यांनी हाच किस्सा सांगितला. “ते म्हणाले माझ्याकडे एक व्हिडिओ आला. मुलं टॅक्सीने चालली होती. पोलीस म्हणतात 50 ग्रॅम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का? हे काय चाललं ते कळतंच नाही” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच गृहखात्याकडून या पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.

पवन सांगळे असं या पोलीसाचं नाव आहे. सायन पोलीस स्टेशनला तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. या व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या पवन सांगळेला निलंबित केलं आहे.

आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा याच व्हिडिओवरुन पोलीस महासंचालकांची भेट घेतली. “अशा प्रकारे धमकावणाऱ्या पोलिसाला निलंबित करावं अशी आमची मागणी होती. पोलिसांनी ती मान्य केली. पोलीस 50 ग्रॅम पुडीची भाषा करतो. पोलीसच अंमली पदार्थांचं रॅकेट चालवत आहेत का?. कांडला बंदरातून हे ड्रग्स येतात का?. हा मोठा विषय आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली याची चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे