न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत झालेल्या वादळी पावसामुळे अंदाजे २६ लाखांचे नुकसान

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडीत काल झालेल्या वादळी पावसामुळे अंदाजे २५ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज शुक्रवारी दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
शहरात जवळपास २५ ठिकाणी झाडे पडणे, महावितरण पोल वाकण्यासह ४ घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तसेच पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठी हानी झाली. यात शहरातील ज्योती मुद्राळे यांचे अंदाजे १८ हजार, दीपक गावडे २२ हजार, प्रशांत गोसावी १९ हजार, चेतन गुप्ता २० हजार, स्नेहा सबनीस ५० हजार, वैभव सावंत यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने ११ लाख ७५ हजार रुपये, शेजारील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे १२ लाख ६६ हजार रुपये तर गौरी परब यांचे २० हजार रूपयांचे मिळून एकूण अंदाजे २५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी दिली आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत नागरिक आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे