न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्र गुजराती उद्योगपतींना विकणा-या भाजपाच्या कळपात गेलेल्या गद्दारांना धडा शिकवा: उध्दव ठाकरे

परभणी / प्रतिनिधी

गुजराती उद्योगपतींच्या हाती महाराष्ट्र देऊन आपल्याला उपरे करणा-या आणि भाजपाच्या शिंदेगटासोबत  बरोबर पळून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्या मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत केले.

राम मंदीर लुबाडणारी भाजपा हि बाबर जनता पक्ष आहे अशी टीका करीत उध्दव या नवी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचा टोला लगावत त्यांचे लवकरच पंख छाटले जाणार असल्याचा दावा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पु्न्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासावर भाष्य करताना नवा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या विमानात दोन्ही नेते आजूबाजूला बसले नसले तरी एकाच रांगेत बसले होते. दोघांच्या विमान प्रवासावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या याच विमान प्रवासाबाबत भाष्य करत असताना आपल्याला त्यांच्यातील हतबलता दिसली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

काल-परवा माझ्यासोबत तिकडे विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हतं की, हे मुख्यमंत्री आहेत, असे काय झाले आहेत? आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय, आपले पंख कापत आहेत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

आपण करायचं काय? आणि न्याय तरी कुणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार. हे दार उघडलं तरी पंख कापणार. मग जे काही वाचलं आहे. ते वाचवून, जेवढी दिवस आहेत तेवढे दिवस ढकललेले बरे, या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच आपल्या सांगण्यावरून आपण ओमराजेंना मतं दिली आणि आता तो पळून गेला.त्याबद्दल आपण आपली माफी मागतो असे सांगत नव्या दमाने आणि जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे