न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार, प्रा. रुपेश पाटील 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे.

     “निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार असून योग ही निरोगी, संतुलित आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाशी नाते जपावे आणि दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करून शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधावा,” असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे ‘निसर्ग व योगाचे महत्त्व : आपली जबाबदारी आणि कर्तव्य’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे वैचारिक मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शिबिरात प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व उदाहरणांसह तसेच पॉवर पॉइंट सदरीकरणातून समजावून मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाळ जपावी, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि योगाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य साधावे, या उदात्त हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रा. रुपेश पाटील यांचे शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व सुपारीचे रोप देऊन स्वागत केले.

योगाच्या महत्त्वावर विवेचन करताना प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत होते, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावावर योग हा प्रभावी उपाय असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि स्वच्छतेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रिचर्ड सालदान्हा यांनी केले. सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शारदा गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक दत्ताराम नाईक यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे