मालवणात दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील देवली शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात ओंकार निकम (२१) आणि राजू अर्जुन निकम (३०) यांचा मृत्यू झाला. तर सचिन निकम गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


