न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले सहकुटुंब श्री गणरायाचे दर्शन

मुंबई/ राजू तावडे

महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो, तसेच श्री गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनातील विघ्ने दूर होवोत, अशी प्रार्थना मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली. यावेळी सौ. नंदिता राणे, कु. निमिष राणे यांचीही उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे