न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत नारळी पौर्णिमा उत्साहात

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सालाबादप्रमाणे सावंतवाडीकरांच्या वतीने मोती तलावाला मानाचा सुवर्ण नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला.

मसावंतवाडी पोलिस ठाण्यातून प्रथेनुसार मानाचा नारळ ढोल-ताशांच्या गजरात मोती तलावाकडे आणण्यात आला. तलावाच्या काठावर सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते सुवर्ण नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर मानाचा सुवर्ण नारळ मोती तलावाच्या जलराशीत अर्पण करण्यात आला.

 

नारळ तलावात अर्पण होताच उपस्थित युवकांमध्ये तो मिळविण्यासाठी उत्साहाची लाट उसळली. अनेक युवकांनी तलावाच्या पाण्यात उड्या घेत नारळ मिळविण्यासाठी चुरस केली. या पारंपरिक सोहळ्यामुळे मोती तलावाचा परिसर काही काळ जल्लोषाने दुमदुमून गेला.

 

दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्याला यंदा तुलनेने गर्दीचे प्रमाण काहीसे कमी दिसून आले. असे असले तरी राजघराण्याची परंपरा, पोलिसांची शिस्त आणि सावंतवाडीकरांच्या सांस्कृतिक नाळ यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे