न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांद्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

   बांदा येथे नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. परंपरेप्रमाणे सायंकाळी श्री बांदेश्वराची पालखी वाजतगाजत देवाचा नारळ घेऊन तेरेखोल नदीकडे रवाना झाली. मार्गात श्री विठ्ठल मंदिर व श्री पाटेश्वर मंदिराचे नारळ पालखीत ठेवण्यात आले. नदीवर वार्षिक पारंपारिक पुजा करुन देवांचे नारळ नदीला अर्पण करण्यात आले. त्यानंतर लोकांनी आपले नारळ नदीत टाकले. लोकांना तेरेखोल नदीवरील बांदा शेर्ला पुलावर उभे राहून कार्यक्रमात सहभाग घेता आला. पुलावर दुतर्फा तसेच खाली नदी काठीही लोकांची मोठी गर्दी होती. नदीतील नारळ गोळा करण्यासाठी अनेक नाविक व जलतरणपटू नदीपत्रात होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे