देशातील सर्वात श्रीमंत शहर… मुंबईच… तर पुणे सातव्या स्थानावर
मुंबई/
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने आपले श्रीमंतीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. देशातील टॉप शहरात ते प्रथम स्थानावर आहे. जीडीपीच्या आधारे जाहीर श्रीमंत शहरात दिल्ली एनसीआर दुसऱ्या तर कोलकता तिसऱ्या आणि बेंगळुरू चौथ्या स्थानावर आहे.चेन्नई पाचव्या व हैदराबाद सहाव्या स्थानावर आहेत. पुणे सातव्या तर अहमदाबाद आठव्या स्थानावर आहे. सुरत नवव्या आणि विशाखापट्टणम दहाव्या स्थानावर आहेत.


