तळोद्यात विद्युत ट्रान्सफॉर्मला अचानक आग
नंदुरबार/
तळोदा शहरातील काकशेठ गल्ली जवळ रात्री भीषण प्रसंग घडला. विद्युत ट्रान्सफॉर्मला अचानक आग लागली. परिसरात काही क्षणांकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि विजेचा पुरवठा तातडीने बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री दरम्यान अचानक खांबावरून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच डिपीतून धूर व ज्वाळा निघू लागल्या नागरिकांनी तत्काळ माती आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.”


