मुंबई गोवा महामार्गावर कोलवाळ येथे ट्रक चालकाची आत्महत्या…
म्हापसा/
कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाने उभ्या कंटेनर ट्रकच्या साहाय्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. पप्पू सिंग (वय ५९) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलवाळ महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर कंटेनर ट्रक उभा करण्यात आला होता. संबंधित चालकाने ट्रकच्या टपावर चढून शेजारील झाडाच्या फांदीला दोरी बांधून गळफास घेतला.”


