न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उत्तर भारतात अवकाळीचा हाहाकार… ५६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली. निसर्गाच्या या कोपामुळे राज्याच्या विविध भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.”
वादळ आणि पावसामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक जीवितहानी प्रयागराज आणि भदोही जिल्ह्यांत झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.”
राजधानी दिल्ली आणि परिसरात ताशी ९० ते ९८ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खराब असल्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १५ विमानांचे लँडिंग जयपूर, चंदीगड आणि लखनौकडे वळवण्यात आले आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्याने किंवा विलंबाने होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे