अलवर येथे बस टॅंकर अपघातात चार ठार तीस जखमी
जयपूर/
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आणि केमिकल टँकरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३० जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानमधील अलवर येथे भयंकर अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. जखमी लोकांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितलेय.”


