मुंबई नाशिक महामार्गावर उभ्या ट्रकला कारची मागून धडक… चालक ठार
मुंबई/
मुंबई-नाशिक महामार्गावर चार चाकी वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रेलर ट्रकला मागून धडकल्याने अपघात झाला आहे. अपघाताची पहाटे चार वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे माहिती प्राप्त झाली. वाहनचालक दीपक पटेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असून यातील तीन पुरुष एक महिला यांच्यावर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे


