न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नांदेडच्या मुखेड तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा

नांदेड/

नांदेडच्या मुदखेड तहसीलवर आज काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले असून खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे.

मुदखेड शहरातील ठाकरे चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात गाढवाच्या पाठीवर सरकार आमच्या सारखं वागू नका असे बॅनर लावण्यात आले आहेत. खत बियाण्यांची मोठ्या प्रमाणात दर वाढ झालीय, महागाईंचा आगडोंब उसळलाय. मशागतीसाठी लागणारा डिझेलचा काळाबाजार होऊ लागलाय. अनेक मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला नाहीये. खतांचा व्यापारी कृत्रिम तुकडा निर्माण करीत आहेत या सह विविध मागण्यांसाठी आज काँग्रेस आक्रमण झाले होते. सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत गाढवपणा करू नये अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे