न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रात्री पुन्हा जंतरमंतर पोलीसांकडून विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार

 नवी दिल्ली /  वृत्तसंस्था

पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच दरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे, तसेच आश्रुधुराच्या नकळांड्या देखील फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इथे आता तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे