सोलापूरात सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची तुंबळ गर्दी
सोलापूर / वृत्तसंस्था
सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची तुंबळ गर्दी. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात सभासदांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते. मात्र,अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली. साखर मिळवण्यासाठी रांगा लागल्या असून,गर्दी वाढल्याने कारखाना प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झाल्याचं दिसून आलं.


