न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आई-वडिलांच्या ऋणाची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी केली आईची पाद्यपूजा

सिंधुदूर्ग / राजू तावडे

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराच्या अन्नशांती सभागृहात ‘मातृ-पितृ देवो भव’ या संकल्पनेवर आधारित ‘मातृ-वंदना’ विशेष संस्कारी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

‘आईसारखे दैवत नाही, माता ही सर्वश्रेष्ठ’ या भावनेतून आयोजित कार्यक्रमात मुलांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून मातृवंदना केली. आईची पाद्यपूजा हा मुलांसाठी प्रेरणादायी संस्कार ठरावा, या उद्देशाने सुंदर प्रक्षेपणाच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी ‘आई’ या विषयावर ५०० शब्दांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ६० निबंध प्रवेशिका प्राप्त झाल्या. शालेय व खुला अशा दोन गटांतून १६ स्पर्धकांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी अन्य स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे