न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीवरून दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेक पोस्टवरून पत्रादेवी येथे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहन चालकांनी या कालावधीत पत्रादेवी मार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि संबंधित वाहतूक यंत्रणांनी प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन व समन्वय साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे