न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नागरिकांनी ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ अधिसूचने विरोधात हरकती नोंदवाव्यात: उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे

केंद्र शासनाकडून दि.२७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) अधिसूचने विरोधात शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे. नगरपरिषद हद्दीत हा झोन लागू झाल्यास शहराच्या भविष्यातील विकासाला मोठा आळा बसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेने १४ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला स्पष्ट विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला आहे. या झोनमुळे शहरात कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना परवानगी मिळणार नाही. तसेच नवीन विकास प्रकल्प, स्थानिक व्यवसाय, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर कठोर बंधने येतील. यामुळे शहराचा संपूर्ण विकास थांबून नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती उपनगराध्यक्षांनी व्यक्त केली.
नगरपरिषदेने घेतलेल्या विरोध ठरावाला अधिक बळ देण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे. नागरिकांनी ‘मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद’ यांच्या नावाने किमान २ ते ३ हजार हरकती नोंदवाव्यात. नागरिकांच्या या सर्व हरकती आणि प्रशासकीय कागदपत्रे एकत्र करून केंद्र शासनाकडे पाठवली जातील, ज्यामुळे हा बाधक ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे अधिक सक्षमपणे मांडता येईल, असे ॲड. अनिल निरवडेकर यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे