साखर महागली… जिभेवरचा गोडवा कमी झाला… कटिंग चहा कालबाह्य झाला
संतोष मुळीक
काल परवा पर्यंत आपल्या जिभेवर असलेला चहाचा गोडवा आता कडू व्हायला लागला आहे…त्याचे कारण हा गोडवा निर्माण करणारी साखर खूपच महागली आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीत सर्वाधिक ७५रु दर नोंदवला गेला आहे. हॉटेलमध्ये सध्या कटींग बंद करण्यात आली आहे…
देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र, तेलंगणातील काही भागात केले जाते. पैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटकात…पडलेल्या अपु-या पावसामुळे साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती असल्याचा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
सणासुदीचे दिवस असल्यामुळे आणि दिवाळी पर्यंत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.निर्यातही कमी करण्यात येणार असून साखर आयात करण्याची योजना असल्याचे शासनाने सांगितले आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांच्या बहुचर्चित इथेनॉल आणि पेट्रोल यांचा संबंध जोडून विरोधक इथेनॉलसाठी साखर महाग झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे… कोणी काहीही म्हटले तरी सध्या तरी गोडवा जाऊन कडवटपणा आला एवढं नक्की…


