न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

यवतमाळात ४८ तासांत उष्माघाताचे ८ बळी

 

यवतमाळ/

विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्मघातामुळे गेल्या ४८ तासात ८ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे
दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती, यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये दोन तर बाभुळगावच्या गवंडी येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये यातील चौघांची ओळख पटलीये चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला.”
तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णामुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलर मध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं,रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून,भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे