न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणेंच्या निवेदनानंतर शिक्षणमंत्र्यांची तातडीने कार्यवाही 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

     सावंतवाडी तालुक्यातील डेगवे जिल्हा परिषद शाळांच्या छप्पराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण उर्फ बबन राणे यांनी मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी डेगवे शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी ‘खास बाब’ म्हणून निधी मंजूर करण्याची मागणी केली. मंत्री श्री. भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणी “तात्काळ कार्यवाही करावी” असे लिखित आदेश दिले आहेत.

शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डेगवे गावातील दोन शाळांची भीषण परिस्थिती मांडली. डेगवे मोयझरवाडी जि. प. शाळा क्र. २ या शाळेचे छप्पर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आंबेखणवाडी जि. प. शाळा क्र. ३ या शाळेचे छप्पर हि पूर्णपणे मोडकळीस आले असून सध्या ते ताडपत्री घालून झाकून ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी येथे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या दोन्ही शाळांचा संभाव्य धोका लक्षात घेता लाकडी छप्पराऐवजी नवीन लोखंडी छप्पर करणे अनिवार्य आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही शाळांना प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे तातडीचा निधी मंजूर करावा, अशी विनंती नारायण राणे यांनी ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत दादा भुसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग – तात्काळ कार्यवाहीचा शेरा मारून प्रशासनाला गतीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे डेगवे ग्रामस्थ व पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे