न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग किल्ल्यातील ढासळलेल्या बुरूजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग खचल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी महसूल प्रशासनामार्फत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाला पत्र पाठवून संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या निर्देशानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद् डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उपमंडळाचे संरक्षण सहाय्यक संकेत कावळकर, मालवणचे तहसीलदार गणेश लढे, देवबागचे ग्राम महसूल अधिकारी श्री. वायाळ तसेच त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी केली.

संयुक्त पाहणीदरम्यान खचलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता तसेच जुन्या दगडी बांधकामाची अवस्था तपासण्यात आली. याशिवाय सतत धडकणाऱ्या समुद्री लाटा, भरती-ओहोटीचा परिणाम आणि मुसळधार पावसामुळे बुरुज व तटबंदीवर झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या वेळी आवश्यक ती सर्व तांत्रिक निरीक्षणे नोंदविण्यात आली. तसेच अचूक मोजमाप करून किल्ल्याच्या संवर्धन व दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरणारी महत्त्वाची माहिती संकलित करण्यात आली. या अहवालाच्या आधारे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून पुढील संवर्धनात्मक उपाययोजना व दुरुस्तीची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे