पुण्यात आज पावसाच्या सरींची शक्यता
पुणे/
हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक ‘ट्रफ’ (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.


