न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांद्यातील श्री विठ्ठल मंदिरात दासनवमी सोहळा उत्साहात

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री रामदास नवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची नित्यपुजा होऊन श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दुपारी राम नामाचे सामूहिक नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून महाआरती झाली व महाप्रसादास आरंभ झाला. ठिक ७ वाजता मंदिरात नित्य सायं आरती झाली. त्यानंतर स्थानिक भजनसेवेकऱ्यांची भजन सेवा झाली. या सोहळ्यानिमित्त शेकडो भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे