पेपरफुटी प्रकरण… मुंबईत MPSCच्या सचिवांना काळं फासलं
मुंबई/ वृत्तसंस्था
औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी अखेर विद्यार्थ्यांचा अन् संघटनेचा उद्रेक पाहायला मिळाला. प्रशासनाला वारंवार इशारा देऊनही कारवाई होत नसल्याने, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासले. मुंबईतील या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून MPSC कार्यालयाबाहेर गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे”
MPSC पेपरफुटी प्रकरणी ३ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देऊनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासले”


