न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्यगृहातील बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, लाईट व्यवस्था, मेकअप रूम यांसह परिसराची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटना बरोबरच 3200 कोटी रुपयांच्या पूर नियंत्रण प्रकल्प, रंकाळा परिसर सुशोभीकरण लोकार्पण, सीपीआर हॉस्पिटलचा उद्घाटन, शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण या सह जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे