सावंतवाडीतील महिलेला मिरारोड हॉस्पिटलमध्ये आयसीयुत उंदराने कुडतरले
मुंबई/
मिरा भाईंदर पश्चिमेकडील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील एक अत्यंत संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय सुहासिनी माठेकर या वृद्ध महिलेला रात्री उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ मार्चपासून उपचार घेत असलेल्या या महिलेच्या हाताला उंदराने जखम केल्याने रुग्णालय प्रशासनाच्या स्वच्छतेवर आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


