माहेरचा सत्कार मला पुरस्कार सारखाच वाटतो… अक्षता कांबळी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
महिला दिना निमित्त वाघेरी ग्रामपंचातच्या वतीने रविवार दिनांक १५ मार्च रोजी अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षे समाजकार्य व कलाक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अक्षता कांबळी ह्या वाघेरी गावच्या माहेरवाशीनं आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत वाघेरी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अनुजा राणे व सर्व महिला ग्रामस्थांनी सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन कांबळी यांचा सत्कार केला. ज्या शाळेत मी शिकले, त्याच शाळेत माझा सत्कार होतो आहे, हे माझे भाग्य आहे. हा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या माहेरचा हा सत्कार मला मोठ्या पुरस्कारा सारखाच वाटत आहे. असे मनोगत मालवणी बोली भाषेतून व्यक्त करत अक्षता कांबळी यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.


