न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक, तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक उपस्थित होते. या वेळी विविध पदांवर निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
‌नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी लॉरेन्स डिसोझा व संकेत रावळ यांची निवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी पंकज तुळसळकर व परेश बावकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून लक्ष्मण राऊळ, साईराज सगम, शशांक मलिक, आकाश चौगुले, शिवा गावडे, प्रज्वल मनीष तेरसे, ऋषिकेश सरमाळकर, प्रसाद दापले, राजेश कावले, विनोद चौगुले, मनीष राऊळ, विजय साटेलकर, सचिन साटेलकर, सुजल दळवी, विशाल गायचोर, निखिल साळगावकर, सोहम राऊळ आणि भाग्येश नाईक यांचा समावेश आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे सावंतवाडी शहरात भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असून युवकांच्या सक्रिय सहभागातून पक्षविस्ताराला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे