न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपाने विश्वासघात केला… साताऱ्यात झेडपीत हाणामारी… मंत्री शंभूराजे जखमी

सातारा| वृत्तसंस्था

सातारा जिल्हा परिषद सत्तसंघर्षात भाजपने मोठा डाव खेळत शिंदे गट आणि राष्ट्रवादीला दणका देत जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्वाची पदे आपल्या ताब्यात घेतली. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली.

भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आला होता. या सगळ्या घडामोडीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षितरित्या सभागृहात पोहोचवले. यावेळी सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांच्या हाताला देखील लागले.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे