न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हुश्श… रिक्षासह कॅब चालकांच्या मनमानी पासून सुटका … देशातील पहिले सहकारी टॅक्सी सेवा पुण्यात १ मे पासून सुरू..

पुणे | वृत्तसंस्था 

 टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या मनमानीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा आता पुण्यात सुरू होणार आहे. मे महिन्यापर्यंत पुण्यात भारत टॅक्सी धावणार अशी माहिती पुणे आरटीओने दिली आहे. यामुळे पुणेकरांना ओला, उबरऐवजी एक स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारकडून या वर्षीच भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे फक्त प्रवाशांनाच फायदा होणार नसून टॅक्सी चालकांनाही जास्तीत-जास्त परतावा मिळणार आहे. सध्या ही सेवा दिल्आली आणि गुजरात मध्ये सुरू आहे. आता पुण्यातही या सेवेचा विस्तार होणार आहे. ओला-उबरमध्ये कंपनीला उत्तर द्यावे लागत असून भारत ट्रक्सी सेवेमध्ये चालक स्वतः मालक असतील. हा अॅप सहकारी मॉडेलवर आधारित असून मिळणाऱ्या परताव्यापैकी 80 टक्के पैसे टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहे अशी माहिती पुण्याच्या आरटीओ अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, उबर, ओला किंवा रॅपिडोसोबत काम करणारे टॅक्सी चालकही भारत टॅक्सी सेवेचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा संपूर्णपणे सहकारी असून वाहनचालकांवर बंधनं नसतील अशीही माहिती देण्यात आली आहे. आरटीओमधील अधिकारी स्वप्निल भोसले यांनी पुण्यात तातडीने भारत टॅक्सी सुरू करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. सध्या कॅब आणि टॅक्सी चालकांसोबत याबाबत चर्चा सुरू आहे. सरकारने मंजूर केलेल्या दरांनुसार भाडे ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू असून प्रस्ताव पाहून टॅक्सी चालक अंतिम निर्णय घेतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे