न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगर परिषदेची मासिक सभा ठेकेदारांच्या टक्क्यावरून गाजली, संजू परब यांनी सादर केले पुरावे. 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

 सावंतवाडी नगर परिषदेच्या आज झालेल्या मासिक सभेमध्ये महत्त्वाचे विषय सोडून ठेकेदारांच्या कामाला मुदत वाढ देण्यात आली. त्यावर संतप्त झालेले शिवसेनेचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ही सभा ठेकेदारांच्या टक्केवारीसाठी आहे का? नागरिकांच्या अनेक समस्या असून त्याकडे लक्ष कोण देणार? असा सवाल करत दोन टक्के घेतल्याचा आरोप केल्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्या जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

विषय सूची वरील तब्बल अठरा विकास कामाच्या मुदत वाढीवरून या विषयाला तोंड फुटले. दोन टक्काचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे अन्य विषय सावंतवाडी शहरात नाहीतच का? असा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांना विचारत वेळ पडल्यास दोन टक्क्यांचे पुरावे आपण सभागृहात सादर करू असा इशारा श्री. परब यांनी दिला. यावर सभापती सुधीर आडीवरेकर यांनी परब यांना आव्हान देताच, चार विकास कामांचे पुरावे देत, ही कामे पूर्ण झाली आहेत. कंप्लीशन रिपोर्ट देण्यात आला असून बिलाचा धनादेशही काढण्यात आला आहे. मग प्रशासनाने काढलेले धनादेश एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप ठेकेदारांना का दिले गेले नाहीत ? असा सवाल उपस्थित करत श्री. परब यांनी प्रशासनाला धारेवर धरले. धनादेश काढल्याची कबुली यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिली. या विषयावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडून वातावरण तंग बनले, यावर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल असे सांगत या विषयाला बगल दिली.

सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक बैठक आज नगराध्यक्षा सौ.श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी विनायक औंधकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी टक्केवारीमुळे नगरपालिकेची बदनामी होत आहे. 57 कोटीच्या नळ पाणी योजनेत भ्रष्टाचार झाला असून मुख्याधिकारी यांनीच या योजनेचा बट्टाबोळ केला असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उघडपणे केला आहे. याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करावा करावा अशी मागणी केली. यावेळी सभापती आडिवरेकर हे आक्रमक झाले. त्यांनी थेट सूर्याजी यांना रोखत श्री. सागावकर यांनी नळपाणी योजने संदर्भात बोलू नये, त्यांनीच या योजनेची पूर्ण वाट लावली आहे असा आरोप केला. मात्र श्री. साळगावकर हे आपल्याच पक्षाचे असल्याचे सूर्याजी यांनी यावेळी आडिवरेकर यांना सांगितले.

शहरातील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पिरापर्यंत जाणाऱ्या नाला बंदिस्त करणे या कामाला मुदत वाढ देण्यावरून देव्या सूर्याजी तसेच देवा टेमकर यांनी आक्षेप घेत सदरचा ठेकेदार हा तकलादू कामे करतो. त्यामुळे अशा ठेकेदाराला कामे न देता त्यांच्याकडून हे काम काढून घ्यावे. त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी केली. यावर योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला ब्लॅकलिस्ट केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष सौ. भोसले यांनी दिले.

नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे विद्युतीकरण करणे, जिमखाना मैदान येथील ड्रेसिंग रूमचे विद्युतीकरण करणे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे विद्युतीकरण करणे या कामाच्या मुदत वाडीवरून नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आक्षेप घेत, संबंधित ठेकेदाराकडून योग्यरीत्या काम केले जात नसल्याचे सांगितले. तर जिमखाना ड्रेसिंग रूम चे काम अर्धवट थांबले असताना त्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे अशी मागणी केली. मात्र बिल अदा केले असले तरी त्याची डिपॉझिट रक्कम शिल्लक आहेत योग्य काम न केल्यास त्याच्यावर ब्लॅक लिस्ट ची कारवाई केली जाईल असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे