निरवडे येथे 3 एप्रिलला ‘ निरवडे महोत्सव २०२६ ‘ चे आयोजन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
निरवडे, माळकरवाडी येथे शुक्रवार दिनांक ३ एप्रिल व ४ एप्रिल रोजी ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. – स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य. रात्री ८:०० वा. – पावणादेवी समई नृत्य (किंजवडे देवगड), रात्री १०:०० वा. – दिनेश मेस्त्री ग्रुप नेरूर यांचा दिमाखदार ‘शिमगोत्सव’ (खास आकर्षण: श्री. गणेश मेस्त्री, इंडियन आयडॉल फेम).
शनिवार, ४ एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. – प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. नागेश आडगावकर यांचा सांगीतिक कार्यक्रम, रात्री १०:०० वा. – ओंकार डान्स अकॅडमी, सिंधुदुर्ग निर्मित भव्य ‘ नृत्यविष्कार ‘, रात्री ११:०० वा. भव्य लकी ड्रॉ सोडत निकाल.
या महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


