न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भविष्यात प्रदीप केळुसकर यांच्या रूपाने एक उत्तम कादंबरीकार मिळू शकेल.. साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

लेखक प्रदीप केळुसकर हे काळाबरोबर चालणारे लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनात दैनंदिन जगण्यातील प्रसंग, संवाद आणि घटनांचा अत्यंत कल्पकतेने वापर केला आहे. मात्र आता थोडा वेळ थांबून त्यांनी भविष्यात कादंबरी लेखनाकडे वळवल्यास मराठी साहित्याला आपल्या कोकणातून एक उत्तम कादंबरीकार मिळू शकतो असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी काढले.
‌सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे शनिवारी प्रसिद्ध कथालेखक आणि कथाकथनकार प्रदीप केळुसकर यांच्या गाजलेल्या कथांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. प्रवीण बांदेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए. बुवा, श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप केळुसकर म्हणाले, मी जन्मापासून लेखक नाही. मला साहित्याची आणि नाट्यक्षेत्राची ओढ होती. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये धंदा बंद असल्यामुळे योगायोगाने लेखनाला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि पाच वर्षांत मी १४३ कथा लिहिल्या.’माणिकमोती’, ‘सांजतारा’ आणि ‘एकापेक्षा एक’ हे माझे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आजच्या काळात कवितांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, कथाकथन कार्यक्रम मागे पडत चालले आहेत. त्याला पुन्हा उभारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात श्री. केळुसकर यांनी आपल्या कथासंग्रहातील ‘विठाई’ व ‘सह्यकडे’ यांसारख्या कथांचे सादरीकरण केले. त्यांच्या शैलीदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला माजी मालवणी कवी दादा मडकईकर, रामदास पारकर, दत्तप्रसाद गोठसकर, वंदना करंबेळकर, मुकुंद वझे, दीपक पटेकर, भरत गावडे, मधुकर मातोंडकर, वैभव पारकर, प्रसाद वर्णे यांच्यासह सावंतवाडीतील बहुसंख्य साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे