न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अ.भा. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या राज्य संघटकपदी पत्रकार सीताराम गावडे

 

सिंधुदुर्ग| राजू तावडे

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या राज्य संघटकपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘कोकण लाईव्ह’चे संपादक सीताराम गावडे यांची निवड झाली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे यांच्या नावाची घोषणा केली केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष राजा माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटकपदी राजेश नाईक, जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सिद्धेश सावंत तसेच तालुका संघटकपदी आनंद धोंड यांची निवड जाहीर करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे