न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न….सर्वच प्रश्नांना मंजुरी

सिंधुदुर्गनगरी/ देवयानी वरसकर

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज अत्यंत वेगवानरीत्या सर्वच प्रश्नांना मंजुरी देऊन पार पडली. सुरुवातीपासूनच प्रत्येक सूचना व विषय पत्रिकेवरील विषय यावर सदस्यांकडून मंजूर मंजूर च्या घोषणा आल्याने सूचना व विषय पत्रिकेवरील विषय यावर आधारित जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अवघ्या अर्ध्या तासात आटपली.
त्यानंतर आयत्या वेळेसच्या विषयांवर मात्र सदस्यांकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दादा साईल वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर,आरोग्य सभापती प्रितेश राऊळ महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण सभापती रुहीता तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच संजय गावडे यांनी सभेची नोटीस आपल्याला मिळाली नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी सर्वच सदस्यांनी कडाडून विरोध करत ती सूचना म्हणून घ्या असे म्हणून तो विषय संपविला यानंतर घनकचरा व्यवस्थापन, जलजीवन मिशन, हर घर तिरंगा याबाबत सूचनांवरील कार्यवाहीची माहिती देण्यात आली त्याला सभागृहाने मंजुरी दिली.
बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेमध्ये जे रस्ते घेतले जाणार आहेत त्याला संमती पत्र न देता जे जुने रस्ते आहेत ते 23 नंबरला लावून घ्यावेत व त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशी सूचना गोट्या सावंत यांनी मांडली त्याला सर्वच सदस्यांनी मंजुरी दिली.
खारेपाटण मधील कुरणवली वाडी मध्ये गेल्या 30 वर्षात वीज पुरवठा व्हावा अशी सातत्याने मागणी करून देखील वीजपुरवठा झालेली झालेला नाही हे खारेपाटण येथील सदस्या सौ. इस्वलकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले यावर संपूर्ण सभागृह अवाक झाले उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत संयुक्तिक उत्तर देता न आल्याने या वीज प्रश्नांसंदर्भातील सर्वच प्रश्नांवर स्वतंत्रपणे बैठक घेण्याचे ठरले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये कांदा लसूण चटणी मसाला वितरित केला जातो.या मसाल्याला तो ओलसर असल्यामुळे लवकर बुरशी लागते याबाबतचा सोदाहरण खुलासा सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी केला. त्या येताना कांदा लसूण चटणी मसाल्याचे पाकीटच घेऊन आल्या व सभागृहाच्या या गोष्टी त्यांनी निदर्शनास आणल्या. यावर सदस्य सौ. वाळके यांनीही मराठी शाळांमध्ये जो पोषण आहार दिला जातो तो देखील निकृष्ट दर्जाचा असतो.सफेद वाटण्यांमध्ये कुठलेही जास्त पोषणमूल्य नसताना ते येथील विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने थोपविले जातात असे मांडले. यावर गोट्या सावंत यांनी सिंधुदुर्गातील अनेक बचत गट आहेत की जे दर्जेदार उत्पादने करीत असतात. या बचत गटांमधील मसाले व तत्सम पदार्थ या शाळांमध्ये देण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी घेण्यात यावेत.जेणेकरून बचत गटांच्या मालाची विक्री ही होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथील धान्य व मसाले स्वयंपाकासाठी वापरता येतील.
एस.टी. संदर्भात देखील अनेक सदस्यांनी सूचना मांडल्या.यामध्ये वस्तीच्या गाड्या वेळेत येत नाहीत कोणतेही पूर्व सूचना न देता गावांमधील गाड्या यांच्या फेऱ्या रद्द केल्या, जातात, एसटी च्या गाड्या वेळेत नसतात यांचा समावेश होता. यावर देखील एक स्वतंत्र बैठक घेऊन या संदर्भात कार्यवाही करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.
गावामध्ये जी काही हवामान केंद्र आहेत त्यामुळे काही गावांमधील शेतकऱ्यांना त्यांना आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी फार मोठा फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.या केंद्रांच्या चुकीच्या मापनामुळे अनेक शेतकरी हे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत. असे सदस्य मायकल डिसोजा यांनी सभागृहासमोर मांडले.
याचीच री अनेक सदस्यांनी ओढली आणि हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन प्रत्येक गावांमध्ये हवामान केंद्र व्हावे असे मागणी यावेळेस करण्यात आली.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा म्हटली की पाच ते सहा तासांचा कालावधी हा लागतोच असे अपेक्षित धरले जाते मात्र आज सभेच्या सुरुवातीपासूनच एकूणच कामकाजाने गती धरली आणि सूचनांपासून विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देत सभा अक्षरशः अर्ध्या तासात पार पडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे