मुक्ताई आली बीड शहरात…
बीड/ वृत्तसंस्था
आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी आज बीड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाली. पालखी आगमनानिमित्त बीड नगरपरिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेत, शहरातील सुभाष रोडचे नामकरण ‘संत मुक्ताई पालखी मार्ग’ असे केले आहे. पालखी ज्या मार्गाने दरवर्षी शहरात प्रवेश करते, त्या मार्गाला हे नवे नाव देण्यात आले. समस्त वारकरी, भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण असून, संत परंपरेचा सन्मान करणारे हे पाऊल असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.”


