आमदार निलेश राणे यांना मंत्रिपद मिळू दे, दैवज्ञ गणपती मंदिरात अभिषेक व प्रार्थना
सिंधुदुर्ग / राजू तावडे
अंगारकी संकष्टी निमित्त कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नावाने दैवज्ञ गणपती मंदिर मध्ये चांदीच्या गणेश मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यांना दीर्घायुष्य लाभो व उत्तम आरोग्य लाभो व त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत व पुढची गणेश चतुर्थी येण्यापूर्वी त्यांना मंत्रिपद मिळूदे अशी प्रार्थना करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांना दुष्काळ ग्रस्त परिस्थितीचा सामना करायची शक्ती मिळूदे. राणे कुटुंबियांना व खासदार नारायण राणे यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभूदे अशी गणपती कडे प्रार्थना करण्यात आली.


