दिवेआगर समुद्रात आळंदीतील ८ जणांचा मृत्यू
अलिबाग/ रत्नाकर प्रभू
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी एक मोठी आणि सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले आठ जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. किनाऱ्यावर आनंद लुटत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.”
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडलेल्या आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचाराधीच त्यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे
1. राजवीर वाहिले
2. सोहम भांडवळकर
3. कौस्तुभ दोंड
4. यश वानखेडे
5. कैवल्य वासंकर
6. तन्मय वाहिले
7. सुमित अहिरे
8. प्रणव बनसोडे”


