वाशिमला शिवशाही बसला अपघात
वाशीम/
वाशिमच्या तोंडगाव फाट्याजवळ शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली वरून अकोला कडे ही शिवशाही बस जात होती. बस मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचाराकरिता वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या साह्याने ही बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे


