न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

साता-यात ३० लाखांचा बनावट खतांचा साठा जप्त

सातारा / वृत्तसंस्था

खरिपाचा हंगाम सुरु असताना सातारा जिल्ह्यातील वडूज इथं बनावट खतं आणि कीटक नाशकांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय.. कृषी विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत तब्बल 30 लाख 60 हजारांचा हा साठा जप्त केलाय. या कारवाईत सुमारे 99 हजार 450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, कीटकनाशके आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आली.या प्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतिक दिलीप काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू झाला, याचा तपास पोलीस आणि कृषी विभागाकडून सुरू आहे. तसेच बनावट खतांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे