न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर परशुरामघाटाला धोका

रत्नागिरी/ वृत्तसंस्था

चिपळूणच्या परशुराम घाटात  एक नवा धोका निर्माण झाला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीट मार्ग खचला आहे. पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनल तुटले आहे. तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. घाटाच्या संरक्षण व्यवस्थेलाच तडा गेला. गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली आहे. त्यामुळे दुहेरी धोक्यामुळे परशुराम घाटाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घाट संरक्षणाचे काम ऐरणीवर आले आहे. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटविण्याची गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे