सांगलीत वादळी वा-यासह अवकाळी पावसाने घराची भिंत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
सांगली/
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला..
यावेळी द्राक्ष बागेच्या शेड वरील पत्रे आणि आणि घरावरील पत्रे अनेकांचे उडून गेले त्यामुळे नुकसान झाले.
तर खलाटी येथे आनंदा बिरु शेजुळ यांच्या घराचे पत्रे उडुन गेले. आणि त्याच दरम्यान घराची भिंत पडून अवघ्या 8 महिन्याच्या लहान मुलगा श्रीवर्धन शेजूळ हा मयत झाला आहे”


